22 Dec 2025, Mon

बॅग दुकानाच्या नावाखाली गांजा, मद्य व गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त.

इचलकरंजी: शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने कबनूर परिसरातील ‘पायल बॅग व पायल हॉल’ या दुकान व पानपट्टीवर छापा टाकून सुमारे ४५,९३२/- किमतीचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करत दोन जणांना अटक केली. अटक आरोपींमध्ये उदय लक्ष्मण वसवाडे (५१) व योगेश युवराज वसवाडे (३०) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून १ किलो २४० ग्रॅम गांजा (२४,८००/-)वेगवेगळ्या कंपन्यांच्या देशी-विदेशी दारूच्या ६५ बाटल्या व टिन (११,४३५/-)९७ गुटख्याचे पुडे (९,२५७/-) तसेच भांगाच्या गोळ्या व गो-गो पट्ट्या (२९०/-) असा एकूण ४५,९३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर आरोपींनी सदर मुद्देमाल विक्रीसाठी बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला असल्याचे निष्पन्न झाले. पो.कॉ. सुनिल दत्तात्रय बाईत यांच्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस. अ‍ॅक्टबी.एन.एस.अन्न सुरक्षा अधिनियमतंबाखू नियंत्रण कायदा व दारूबंदी कायदा आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *