Team IBN 7 – सांगली : थकीत मालमत्ता कर (घरपट्टी) वसुलीसाठी महापालिकेने बुधवारी 6 थकबाकीदारांच्या मालमत्ता सील व जप्त केल्या. यामध्ये महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती महादेव तम्माण्णा कुरणे यांच्या दुकान गाळ्याचा समावेश आहे. थकबाकीदार सहा मालमत्ताधारकांची थकबाकी 33.16 लाख रुपये आहे. दरम्यान, महापालिकेच्या कारवाईच्या बडग्याने अन्य पाच थकबाकीदारांनी 20.26 लाख रुपयांची घरपट्टी भरली. थकबाकी वसुलीसाठी महापालिकेची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले.
महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात विशेष जप्ती मोहिम हाती घेतली आहे. वेळोवेळी नोटीस देऊनही थकबाकी न भरलेल्या मालमत्ताधारकांविरोधात जप्तीची कठोर कारवाई सुरू केली आहे. सील व जप्त केलेल्या मालमत्ता (कंसात थकबाकीची रक्कम) : साईप्रसाद फूडस्ची जिल्हा परिषद परिसरातील मालमत्ता (6.43 लाख), रुक्मिणी पॅकेजिंग इंडस्ट्रीजची माधवनगर रोडवरील मालमत्ता (5.69 लाख), मुनीर मगदूम यांची औद्योगिक वसाहतमधील मालमत्ता (9.31 लाख), इंडियन ऑईल कंपनी विरूपाक्ष पेट्रोलियमची चैतन्यनगर, सांगली (4.84 लाख), अण्णासाहेब घाडगे यांची कर्मवीर चौक मिरजजवळील मालमत्ता (2.02 लाख), महादेव कुरणे यांची हायस्कूल रोड मिरज येथील मालमत्ता (4.86 लाख).
जप्तीपूर्व नोटीस बजावताच थकबाकीची रक्कम भरलेले थकबाकीदार : जवाहर अर्जुन पटेल (टिंबर एरिया सांगली) ः 3 लाख, सिंधी पुरूषार्थी पंचायत ट्रस्ट शामरावनगर, सांगली ः 2.01 लाख, ऑरबिट क्रॉप सायन्सेस, चिंतामणीनगर सांगली ः 1.49 लाख, दत्तात्रय पवार (एसएफसी मॉल सांगली) ः 1.40 लाख, संतोष आरवट्टगी (वंटमुरे कॉर्नर मिरज) ः 12.34 लाख रुपये.

