Team IBN 7 ( सांगली ) : बलवडी (खा.) येथील शांताबाई दिनकर जाधव यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मोठा ऐवज पळवला होता. याबाबत शांताबाई जाधव यांच्या तक्रारीवरून विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी भिवघाट परिसरात आणला आहे. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. अंगझडतीत त्यांच्या ताब्यातून मौल्यवान सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत झाला.
अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
- शहाजी नंदकुमार मंडले (वय ३१ वर्षे, रा. अग्रणी मळा, खानापूर, ता. खानापूर, जि. सांगली)
- नितीन मल्हारी ठोंबरे (वय ३० वर्षे, रा. चोपडेवाडी, खानापूर, ता. खानापूर, जि. सांगली)

आरोपींच्या ताब्यातून एकूण ₹८ लाख ६६ हजार ८२१ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. यात सोन्याचे गंठण, अंगठी, बोरमाळ, टॉप्स, मंगळसूत्र, चांदीची पैंजण, मासोळी, कंबरपट्टा, चांदीचे बिस्कीट, गणपती मूर्ती आणि ₹१.३० लाख रोख रक्कम यांचा समावेश आहे.

या कारवाईत पीएसआय विशाल येळेकर, आण्णासो भोसले, रमेश चव्हाण, सयाजी पाटील, सुहास चव्हाण, सुरेश पाटील, महादेव चव्हाण, जयकर ठोंबरे, प्रशांत जाधव, अमोल नलवडे, शशिकांत झांबरे व शिवाजी हुबाले या अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता.
केवळ ९ तासांत गुन्हा उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केल्यामुळे विटा पोलिसांबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

